जगभरामध्ये कडाक्याच्या थंडीने माणसांसह प्राण्यां नाही गारठून टाकले आहे. अमेरिकेतील एका प्राणी संग्रहालयात कडाक्याच्या थंडीमुळे पाणी गोठले आहे. पाण्याचा बर्फ झाला असून यामध्ये मुक्तपणे विहार करणाऱ्या अनेक मगरीही गोठल्या आहेत. शारलोट पासून २००मैल दूर असलेल्या ‘शालोट रिव्हर स्वॅम्प पार्क’मधील हा व्हिडिओ आहे. गोठलेल्या पाण्यातही मगर कशी जिवंत राहते या बाबत ची माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे. फेस बुकवर या गोठलेल्या मगरींना ‘सर्व्हाईव्हल मशीन’ असे म्हटले आहे., ‘वातावरणा मध्ये होणारे बदल सर्वात आधी मगरींना कळतात. पाणी जेव्हा गोठण्याच्या स्थितीत पोहोचते तेव्हा मगरी आपल्या तोंडाचा पुढील भाग आणि नाक पाण्याबाहेर काढतात व शितनिद्रेमध्ये जातात. बर्फ विरघळेपर्यंत मगर आपल्या शरिराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करत असते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews